0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले.मंत्रालय येथे  रुग्णालयांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले.मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्यांबाबत शिवसेनेचे  पांडुरंग सकपाळ यांनी राज्यमंत्री  श्री.यड्रावकर यांची भेट घेतली.  मुंबईतील सेंट जॉर्जेस आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसरात तुळस व अन्य औषधी वनस्पतींची लागवड करून नैसर्गिकरित्या प्राणवायू उद्यान (ऑक्सीजन पार्क) उभारणे, रुग्णालयातील औषध पुरवठा, मास्क, पीपीई किट, शस्त्रक्रिया उपकरणांचा पुरेसा साठा उपलब्ध करणे, सिटी स्कॅन, एमआरआय व इतर वैद्यकीय तपासणी उपकरणे आधुनिक करणे आणि पुरेस मनुष्यबळ उपलब्ध करणे. सांस्कृतिक कार्य विभागाकडे वर्ग केलेल्या रंगभवन थिएटरच्या जागेचा सुयोग्य वापर करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन या संदर्भातील प्रश्न सोडविले जातील असे श्री.यड्रावकर यांनी सांगितले.

 

Post a Comment

 
Top