0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  पुणे

विविध खासगी बँकांनी सामाजिक बांधिलकी राखत त्यांच्या ‘सीएसआर’ (सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून ‘कोविड-१९’च्या लढाईसाठी केलेल्या कामांचे उद्घाटन तसेच विविध उपकरणांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. विधान भवनाच्या (कौन्सिल हॉल) सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे, अण्णासाहेब बनसोडे, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे, बंधन बॅंकेचे प्रादेशिक प्रमुख सत्यजित मोहिते, एचडीएफसी बॅंकेच्या राज्य प्रमुख स्वाती शाळीग्राम, लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

 
Top