web-ads-yml-728x90

Breaking News

जीसीटीसी-ग्लोबल काउंटर टेरेरिझम कौन्सिलच्या सेमिनारचे उद्घाटन

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

अनेक युगे वाईट शक्ती आणि चांगली शक्ती यांचे युद्ध सुरू होते, ते आजही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू आहे. जगातील चांगल्या लोकांविरूद्ध दहशतवादी आणि आर्थिक गैरव्यवहार करणारे लोक कार्यरत आहेत. आपण ज्या समाजातून येतो त्याच समाजातून हे लोकही येत असतात. यासाठी त्यांचे वाईट विचार संपवणे महत्त्वाचे आहे. समाजाला एक चांगला विचार देणे गरजेचे असून, प्रत्येक भारतीयांना देशाचे संरक्षण ही आपली जबाबदारी आहे ही जाणीव झाली पाहिजे, असे विचार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

(जीसीटीसी-ग्लोबल काउंटर टेरेरिझम कौन्सिल) जागतिक दहशतवादविरोधी परिषदेने अवैधरित्या पैशाचा व्यवहार (मनी लाँडरिंग) आणि आर्थिक दहशतवाद या विषयावर जागतिक वेबिनारचे आयोजन केले आहे. ही परिषद जोखीम अनुपालन व्यावसायिक संघटना (आरसीपीए) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांवर भारतीय संशोधन परिषद (आयसीआरआयईआर) आणि इंडियन सोसायटी ऑफ इंटरनॅशनल लॉ (आयएसआयएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. हा वेबिनार दोन दिवसीय असून, या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते.

No comments