web-ads-yml-728x90

Breaking News

माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे यांच्या वाढदिवसा निमित्त जेष्ठ नागरिकांचा सत्कार; ब्लँकेट केले वाटप

BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा युवा महाराष्ट्र लाइव्ह टिव्ही चॅनेलचे उपसंपादक तसेच आमदार किसनराव कथोरे विकास मंच ट्रस्टचे संचालक किसन अनंत कथोरे (Kisan A Kathore) यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकाचा सत्कार करून त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.लहानपणा पासून समाजसेवेचे व्रत हातात घेतलेले किसन अनंत कथोरे यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालु ठेवला.अत्यंत शांत स्वाभावी स्वामी समर्थ भक्त म्हणून त्यांची ओळख आहे.मुरबाडचे युवा प्रथम सरपंच ते मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदे भुषवून लोकांची सेवा केली.अनेक चांगले निर्णय घेवुन मुरबाडच्या विकासात भर टाकली.व्यापारी नागरिकाना जाचंक अटीतुन सोडावुन पाणी रस्ते मच्छीमार्केट बाजारपेठ सुशोभिकरण पथदिवे गार्डन गटारी स्मशानभुमी अशी सर्वच कामे किसन अनंत कथोरे यांनी मार्गी लावली.कोणालाही शब्द उलट बोलणार नाही.प्रत्येकाचा मित्र बनून आपल्या परिसर तसेच मुरबाड शहरात विकासाची गंगा आणण्याचे काम त्यांनी केले.गेल्या 20 वर्षे पत्रकारिता श्रेत्रात त्यांनी काम केले आहे.आजही पत्रकारिता श्रेत्रात त्याचं काम उलेखनीय आहे.सामाजिक उपक्रम राबवले त्यांचा छंद आहे त्या निमित्ताने वाढदिवसाचे औचित्य साधुन जेष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना ब्लँकेट वाटप केले.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकडो जेष्ठानी सहभाग घेतला होता.

No comments