web-ads-yml-728x90

Breaking News

कोरोना महामारीचे भान राखून राज्यात श्री दत्त जयंती साजरी

BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

राज्यात आज श्री दत्त जयंती उत्सवात साजरी करण्यात येत आहे.कोरोना महामारी असल्याने श्री दत्त जयंती यंदा साध्या पध्दतीत व सुरक्षित अंतर राखत साजरी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.याच पार्श्वभुमीवर श्वानपथक, वागळे इस्टेट या शाखेत सुध्दा कोव्हीड 19 संदर्भातील शासकीय नियमांचे परीपूर्ण पालन करीत आदरणीय मा.श्री. विवेक फणसाळकर साहेब, मा. पोलीस आयुक्त सो, ठाणे शहर    आदरणीय मा. श्री. लक्ष्मिकांत पाटिल साहेब. पोलीस उपआयुक्त सो।, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे प्रेरणेतून व मा.श्री. सुनिल बाजारे , सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. बेदरे साहेब,गुन्हे शाखा, ठाणे यांचे मार्गदर्शनातून व श्री. गायकवाड साहेब, प्रभारी अधिकारी श्वानपथक यांचे नेतृत्वाखाली व स.पो.उप.निरी.मराळ,म.पो.हवा. सौ.चोले, पो.हवा. कदम, पो.हवा.मराठे, पो.हवा.मुरुडकर, पो.ना.पटेकर यांचे संकल्पनेतून व श्वानपथक कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांच्या श्रमदानातून व  "स्वप्नज्योती टार्इम्स" चे सल्लागार संपादक मा.श्री. मन्साराम वर्मा यांनी औदार्य दाखवत स्वखर्चातून आपले सहकारी दिलीप गिरी यांचे सहकार्याने दिव्य अशा दत्त मंदिराची उभारणी केली. तसेच आज मार्गशीर्ष पोर्णिमा व दत्त जयंती च्या शुभमूहर्तावर सर्व वरिष्ठ आधिकारी व श्वानपथकातील सर्व कर्मचारी यांचे उपस्थितीत सुबक अशा श्री. दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना, जयंती व सत्यनारायण पूजा करण्यात आली. तसेच सर्व वरिष्ठ आधिकारी व श्वानपथकातील सर्व  कर्मचारी उपस्थित श्रीदत्त जयंती पोलिस ठाण्यात साजरी करण्यात आली.या शाखेत येणार्‍या प्रत्येक नागरिकाला आता श्री.दत्ताचे दर्शन घडणार आहे. तसेच साला बाद प्रमाणे टिटवाळा नांदप येथील श्रीदत्त गुरू भक्त हभप गुरूवर्य श्री.वसंत मुकूंद भगत यांच्या मंदिरात सुध्दा श्रीदत्त जयंती साजरी करण्यात आली. संपुर्ण महाराष्ट्रात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बल्लभ दिगंबराच्या गजरामध्ये श्री दत्त जन्मकाळ संपन्न झाले

 

No comments