BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील अनेक APMC मार्केट, आडत बंद राहणार आहेत. अनेक रिक्षा संघटना, ट्रक चालक-मालक संघटनाही या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे रस्ते आणि माल वाहतुकीवरही या बंदचा परिणाम पहायला मिळत आहे.
Post a comment