पुंडलिक खांडेकर यांची राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार २०२० पुरस्कारासाठी निवड
BY - युवा महाराष्ट्र लाइव – धुळे
प्रा. अड. पुंडलिक जयदेव खांडेकर नवलाणे ता. जि. धुळे त्यांनी Doctor of Philosophy (Ph.D.) धुळे जिल्हातील अस्थिव्यंग, कृष्ठरोगी, बुटकेपणा आणि कुबड निघालेल्या दिव्यांग व्यक्तींचे सद्यस्थितीचे सर्वांगीण अध्ययन या विषयावर करीत आहे. दिव्यांग प्रेरणा पुरस्कार, पोलीओ लसीकरणासाठी जनजागृती व प्रत्यक्ष सहभाग , आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय ,राज्य,विभाग व जिल्हास्तरीय परिषदामध्ये दिव्यांगांचे प्रश्न माडलेले आहेत . UID (वैश्विक कार्ड) 1200 लोकांचे संगणकाच्या साह्याने फॉर्म भरले आहेत. पेसा क्षेत्र व पेसा निधी याविषयी जनजागृती, 5 टक्के दिव्यांग निधी (ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद) देण्यासाठी पाठपुरावा व 20 गावात निधी मिळवून दिला आहे.
बाळासाहेब एज्युकेशन सोसायटी मार्फत युवा पुरस्कार, स्वच्छता आरोग्य शिक्षण एकात्मता बालविकास त्यात सक्रिय सहभाग, ग्राम विकासाच्या योजना लोकांपर्यंत पोचवणे, दिव्यांगांची मतदान नाव नोंदणी व पूर्णतः प्रत्यक्ष 100 मतदान दिव्यांगाना मदत, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व कायदेशीर असे कार्य करीत आहेत. त्यामुळे सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिल्या जाणा-या राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार २०२० पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आलेली असुन सदरचा पुरस्कार दि ७-१२-२०२० रोजी वेळ - सकाळी ११ वाजता ठिकाण -हॉटेल सिंग रेसीडेन्सी,तारकपुर बसस्डॅन्ड जवळ, अहमदनगर शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र देवुन आपणास मा. अर्थतज्ञ दत्तात्रय ताटे अध्यक्ष , पंचायत समिती सभापती क्षितीस घुले, बाबासाहेब महापुरे चांद शेख यांच्या मार्फत गौरवण्यात आले. त्याबद्दल माजी आमदार शरद पाटील, माजी जि. प. सभापती सुधीर जाधव , सुधाकर बागुल समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी व नवलाने गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
No comments