0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कुठल्या पदासाठी, पैश्यांसाठी अथवा मानसन्मानासाठी केलेल्या कार्यापेक्षा स्वान्तसुखाय केलेले समाज कार्य आत्मानंद सुख देते. कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही यास्तव मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा मानून आरोग्य सेवकांनी यापुढे देखील आपले सेवाकार्य सुरूच ठेवावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज वैद्यकीय क्षेत्रातील करोना योद्ध्यांना केले.  देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके असून हे कार्य साध्य करणाऱ्या करोना वीर व वीरनारींच्या कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीतर्फे राजभवन येथे कोरोना वीरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स,  दंतवैद्य,  विशेषज्ञ, फार्मसिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांसह खासगी आरोग्य क्षेत्रातील  50 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a comment

 
Top