0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे माता जननीसाठी असलेले उत्कट प्रेम आणि आदर असलेल्या विलक्षण भावनांचे इंग्रजीत अनुवाद करून लेखिका भावना सुमाया यांनी त्या भावना अमर केल्या असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित साक्षी भाव या गुजराती पुस्तकाचा इंग्रजीत अनुवाद पद्मश्री भावना सुमाया यांनी ‘लेटर टू मदर’ या पुस्तकरूपाने केला आहे. या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास वुमन इन लीडरशीप कम्युनिटीच्या संचालक स्वप्ना मोरे, मुख्य उपदेशक श्वेता शालिनी आणि विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

 
Top