web-ads-yml-728x90

Breaking News

नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास यावर्षीपासून प्रारंभ होत असून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. नंदुरबारच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments