web-ads-yml-728x90

Breaking News

जलविद्युत केंद्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – रत्नागिरी

आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्णतेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या  प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन  सर्वतोपरी  मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान दिली.यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन व संसदीय कार्यमंत्री अनिल परब, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराज देसाई, सर्वश्री आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम,  वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग, मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

No comments