web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते रणजितसिंह डिसले यांचा सत्कार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे सत्कार केला.

डिसले यांचे अभिनंदन करुन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू दिली. यावेळी श्री. डिसले यांचे आई वडील देखील उपस्थित होते.दि. 3  डिसेंबर रोजी डिसले यांना लंडन येथील वार्की फाउंडेशनतर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर अवॉर्ड जाहिर झाल्यावर राज्यपालांनी त्यांचे फोनवरुन अभिनंदन केले होते व राजभवन भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार रणजितसिंह डिसले यांनी आईवडीलांसह राज्यपाल कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

No comments