web-ads-yml-728x90

Breaking News

जलदुर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्रातील जलदुर्ग (समुद्री किल्ले) हे इतिहासाच्या समृद्ध वारशाचे साक्षीदार आहेत. म्हणून या जलदुर्ग किल्ल्यांची माहिती आजच्या पिढीला व्हावी, पर्यटन क्षेत्रास उभारी मिळावी यासाठी जलदुर्ग किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील जलदुर्ग यांमध्ये पर्यटन वृद्धी करण्याच्या दृष्टीने विविध उपयोजना राबवाव्यात तसेच यांचे संवर्धन करून येथे पर्यटनास चालना देण्याबाबत चर्चा करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील जलदुर्ग यांचे संवर्धन व्हावे, यांची माहिती महाराष्ट्र, देश यांसह विदेशी पर्यटकांनाही व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घ्यावा, असा मानस खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला.

No comments