0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून सोमवारी आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना एसओपीनुसार कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.मिशन बिगीन अगेन अंतर्गत २१ डिसेंबर २०२० रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने यासंदर्भातील विस्तृत आदर्श कार्यप्रणाली पर्यटन संचालनालयामार्फत जारी करण्यात आली. तथापि, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी पर्यटनस्थळांसंदर्भात काही निर्बंध, सूचना जारी केलेल्या असतील तर त्या बंधनकारक असतील, असे एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a comment

 
Top