web-ads-yml-728x90

Breaking News

ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे भारताची मान उंचावली – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकवणारा आपला शिक्षक जागतिक पातळीवर सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होतो ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असून रणजितसिंह डिसले यापुढील काळातही आपल्या कार्यकुशलतेने देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन देशाची मान उंचावतील, असा विश्वास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला.युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील सात कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक श्री. डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त पालकमंत्री श्री. भरणे यांनी काल बार्शी येथे रणजीतसिंह डिसले यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह कुटुंबीयांचा व त्यांच्या आईवडीलांचा सन्मान केला.

No comments