BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई
विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज अफगाणिस्तानच्या महावाणिज्यदूत झाकिया वर्दक यांची मलबार हिल येथील अफगाणिस्तानच्या दूतावासात सदिच्छा भेट घेतली.
सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे सहसंचालक संजय कोरबु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विश्वस्त आशिष पेडणेकर, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे सचिव अजिंक्य देसाई यावेळी उपस्थित होते.
पटोले म्हणाले की, भारत व अफगाणिस्तानचे ऐतिहासिक संबंध आहेत. पुढेही प्रत्येक क्षेत्रामध्ये हे संबंध असेच वृद्धींगत होतील. मुंबई हे पयर्टनाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. असे सांगून राज्यातील संस्कृती, शिक्षण, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a comment