0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कोरोना महामारीत मागील आठ-नऊ महिन्यांपासून सातत्याने समर्पित भाव ठेवत कोरोना योद्ध्यांनी यशस्वी काम केले. त्यामुळेच आज कोरोना महामारीचे संकट आटोक्यात असून रुग्ण संख्याही कमी झाली आहे. हे सर्वांच्या एकत्रितपणे काम केल्याचे फलित आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वैद्यकीय आणि आरोग्य माहिती व्यवस्थापन संस्थेच्या (MaHIMA) वतीने राजभवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

 
Top