web-ads-yml-728x90

Breaking News

.....आणि तीने दिला जुळयांना जन्म;मुरबाड तालुक्यातील घटना

BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यात एका तांबु नावाच्या गाईला  जुळी वासरे झाली आहेत.अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकरांचे म्हण्अणे आहे.परिसरात या गाईला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे. मुरबाड तालुक्यातील शेतकरी रघुनाथ तुकाराम पष्टे  या कृतिशील शेतकर्‍याच्या या तांबु गाईने जुळया वासरांना जन्म दिल्याची वृत्त सध्या संपुर्ण तालुक्यात वार्‍यासारखी फिरत आहे.मुरबाड माळशेज हायवे लगत सारिखा हॉटेल जवळ रघुनाथ पष्टे या शेतकर्‍याचा गोठा असून शेती सांभाळून तो छोटा मोठा दुधाचा व्यवसाय करत आहे.एकाच वेळी दोन वासरे जन्माला येणे ही लाखातील एखादी घटना असल्याचे रघुनाथ पष्टे मोहन पष्टे व काही जाणकार हे सांगत आहेत.विषेश म्हणजे ही गाय व तीचे वासरू सुखरूप आहेत.योग्य निगा आणि वेळेवर औषधौपचार या त्रिसूत्रीचा वापर करून केलेले संगोपन गाईची गर्भावस्थेतील विशेष काळजी यामुळे ही गाय व दोन्ही वासरे ठणठणीत असून हया जुळया वासरूंचे नाव सर्ज्या आणि राजा असल्याचे रघुनाथ पष्टे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.

 

No comments