web-ads-yml-728x90

Breaking News

बाळाराम (बाळूमामा) सुर्यराव यांचे निधन

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

संपुर्ण ठाणे जिल्हयात देशमुख मराठा समाजाला एकत्र करून सर्व धर्म सम भावात नाव लौकिक असलेले समाज सेवक बाळुमामा सुर्यराव यांचे आल्पशा आजाराने निधन झाले.देशमुख सकल मराठा समाजाची बांधणी करून मराठा समाज हॉल मराठा विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या सोयीसुविधा पुरवल्या सरपंच संघटना मजबुत करून गावांच्या विकासासाठी योगदान दयावं अशी नेहमीच भुमिका साकरणारे बाळुमामा सुर्यराव सर्वच जातीधर्माच्या लोकांचे आवडते नेतृत्व समाजनेता म्हणुन त्यांच्या आठवणी नेहमीच हदयात राहातील परन्तु बाळुमामा सुर्यराव सारख्या नेतृत्वाची आजच्या बदलत्या काळात खरी गरज होती.बाळुमामा सुर्यराव यांनी अनेकाना कोरोना काळात मदत केली.राजकारणात त्यांचा सामाजिक दबदबा होता परंन्तु माणसातला माणूस काळरात्री धावुन मदतीचा हात देणारा प्रसंगी बरोबर येवुन आधार देणारा नेता आपल्यातुन निघुन गेला याचं दुख मनाला चटका लावुन गेले आहे.त्यांच्या कार्याला त्यांच्या सामाजिक सेवेला अप्रतिम सुगंध होता सर्वाचे लाडके मामा एवढया लवकर काळाच्या जाळयात जातील यावर विश्‍वास बसत नाही अशा शब्दात स्वप्नज्योती टार्इम्स,युवा महाराष्ट्र लार्इव्ह टिव्ही चॅनेलचे संपादक नामदेव शेलार यांनी श्रध्दांजली आर्पण केली आहे.

No comments