web-ads-yml-728x90

Breaking News

नादुरुस्त रोहित्रे शेतकऱ्यांना तात्काळ बदलून देण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

राज्यात रोहित्रे नादुरुस्त होण्याची कारणे शोधून तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच रब्बीतील सिंचन सुरळीत होण्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदलून द्यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘महावितरण’ला दिले.डॉ. राऊत म्हणाले, रोहित्र नादुरुस्त झाल्यास रोहित्र दुरुस्तीचा आणि ते बदलून देण्याचा कालावधी कमीत कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी वीज ग्राहकाला तक्रार करण्यासाठी मोबाईल क्रमांक जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. रब्बीचे आता केवळ तीन महिने राहिले असून सिंचनासाठी वीज मिळणे आवश्यक आहे. नादुरुस्त रोहित्र तात्काळ दुरुस्त करावे व तेलाचा पुरवठा त्वरित करावा. याबाबतच्या कार्यवाहीत अजिबात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही डॉ. राऊत यांनी महावितरणच्या फोर्टस्थित कार्यालयात झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.गतकाळात शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना वीज जोडण्या न मिळाल्याने तसेच अवैध पद्धतीने वीजेचा वापर वाढल्याने रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आहेत. नवीन कृषी धोरणात शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्याचे धोरण असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. रब्बीचे आता केवळ तीन महिने राहिले असून सिंचनासाठी वीज मिळणे आवश्यक आहे. नादुरुस्त रोहित्र तत्काळ दुरुस्त करावे व तेलाचा पुरवठा त्वरीत करण्याचे निर्देश डॉ.राऊत यांनी यावेळी दिले.

No comments