web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

चंद्रपूर  जिल्ह्यातील कन्हाळगाव (एकूण क्षेत्र 269  चौ कि.मी.) अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज  राज्य वन्य जीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत घेण्यात आला.राज्यात घोषित  करण्यात आलेली नवीन 10 संवर्धन राखीव क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत.आंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव- सिंधुदुर्ग,चंदगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,आजरा- भुदरगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,गगनबावडा संवर्धन राखीव- कोल्हापूर,पन्हाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,विशाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,जोर जांभळी संवर्धन राखीव-सातारा,मायणी क्लस्टर संवर्धन राखीव- सातारा अशा पश्चिम घाटातील  8 संवर्धन राखीव  क्षेत्रांना मान्यता देण्यात आल्यामुळे वन्यजीवांचा भ्रमणमार्ग मोठ्या प्रमाणात संरक्षित झाला आहे. या आठ तसेच विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

No comments