web-ads-yml-728x90

Breaking News

विकासकामाना गती आमदार किसनराव कथोरे प्रयत्नशिल

 

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे

कोरोना कालावधीत निधी अभावी प्रगतीपथावर असणार्‍या कामाना बे्रक मिळाला होता कोरोना काळात विविध विकासित समस्या निर्माण झाल्या होत्या त्यांना शासनाचा निधी उपलब्ध करून मुरबाड मतदार संघातील अपुर्ण तसेच नवीन कामाना आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रयत्नाने गती मिळणार आहे.रस्ते पाणी आरोग्य शेती विद्युत नगररचना अशा विविध श्रेत्रात आढावा घेवुन आराखडे इस्टीमेंन्ट तयार केले असुन शासनाने लोकप्रति निधीना दिलेल्या 100 टक्के निधीचा फायदा विकासकामाना होणार आहे.मुरबाड विधानसभा श्रेत्रात मोठया प्रमाणात आदिवासी दुर्गमभाग येतो शहरीकरणाशी रोजचे जडणघडण असणारे रस्ते खराब झाले आहेत.शाळा आंगणवाडया स्मशानभुमी बंधारे नळपाणी पुरवठा योजना गावठण प्रकल्प पर्यावरण पर्यटण तिर्थस्थाने शहरीकरण शेती बंधीस्ती विद्युत पुरवठा याकडे आमदार किसनराव कथोरे यांनी विशेष लक्ष वेधुन कोरोना संकटानंतर विकासाला अधिक जलद गतीने प्राधान्य दिले आहे.आमदार किसनराव कथोरे यांना महाराष्ट्र शासनाच्या अर्थिक बजेट कमेटीमध्ये स्थान असल्याने मुरबाड विधानसभेच्या परिसराला भरपुर निधी प्राप्त करून ठाणे जिल्हयाला अधिक निधी प्राप्त करून ठाणे जिल्हयातील अपुर्ण प्रकल्प दरवर्षी उदभवणार्‍या समस्या विकासीत कामे मार्गी लावण्याचा संकल्प आमदार किसनराव कथोरे यांनी केला आहे.शासनाने लोकप्रतिनीधीना 100 टक्के निधी विकासकामासाठी नुकताच दिला आहे.स्थानिक विकास निधी खर्च त्या त्या कामावर झाला पाहिजे असा शासनाचा जीआर आग्रह आहे.अनेकवेळी दरवर्षी लोकप्रतिनिधीना दिला जाणारा निधी खर्च होत नाही शासनाला परत जातो मात्र एकमेव आमदार किसनराव कथोरे असे लोकप्रतिनिधी आहेत की त्यांचा निधी संपवुन इतर खात्याचा निधी आपल्या मतदार संघातील कामासाठी आणतात त्यातुन त्यांचा विकासपर्व जनमानसाच्या समस्या अपेक्षा दुर करतात

No comments