web-ads-yml-728x90

Breaking News

बेवारस अँब्युलन्स् बेजबाबदार कोण !

BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड,ठाणे

आपण देशात काय पहातो यावरचा विश्वास उरला नाही मात्र सरकारी पैशाचा तुराडा करणारे शासकीय अधिकारी गल्लीबोळात नाक्यानाक्यावर जागो जागी रस्त्यारस्त्यावर दिसतील त्यांना मंत्री लोकप्रतिनिधी यांनी मोकळे रान करून दिले आहे. फक्त् जनता जनता करून आपलं चांगभलं करण्याचा गोडस धंदा आता लोकाच्या जीवावरच येवून ठेवला आहे त्याचं जिवंत उदाहारण बेवारस अँब्युलन्स् बेजबाबदार कोण !                

   एकही असा शासनाचा विभाग नाही की तेथे भष्टाचार नाही तसेच अधिका-याची मनमानी बेजबाबदारी नाही जनतेच्या करामधून चालवलेला राजव्यवहार जनतेच्या जिवाशी खेळतयं. सगळ्या विभागातील भष्टाचार वाढत असताना ज्याचं नाव भष्टाचारात गुपित होते त्याची उघड झाप होऊ लागली आहे. सरकारी वाहनाच्या नोदी पासून डिझेल पेट्रोल टायर मॅन्टेनन्स् तर गॅरेजमधील गाड्या यांच्यातील गैर बाजार पाहात होतो. मात्र आता चक्क लोकांना जिवनदान देणारी अँब्युलन्स्वाहानच रस्त्यात टाकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मग त्या वाहनाची चोरी झाली का ? वाहन विक्रीस आणली का ?  वाहन कोणी रस्त्यात सोडली त्यांची नोंद शासन डायरीत झाली काय ? भले वाहन बंद पडले असले मग किती दिवस महामार्गावर ठेवायाची एकतर आम्ही जनतेला 108 अँब्युलेन्स् सेवेची तात्काळ काळजी घेतो सेवा देतो म्हणुन सरकारने 108 वाहन अँब्युलेन्स् ॲडवर्टायझिंग साठी ठेवले काय ? असे अनेक सवाल सरकारला जनता विचारते आणि आम्ही त्याचा पंचनामा करून दाखवते की बेजबाबदारर कोण अँब्युलन्स् डॉक्टर रुग्णालयं आरोग्य्अधिकारी डायव्हर् की राज्य् सरकार थोडी जणाची मनाची असायला हवी इकडे गोरगरिबांना अँब्युलन्स् सेवा विकत मिळत नाही मात्र येथे कल्याण मुरबाड महामार्गावर 108 अँब्युलन्स् धुळखात बेवारस आहे.                

सर कार म्हटलंकी विरोधात बोलायचं नाही लिहायचं नाही मंत्री पासुन लोकप्रतिनिधी अशा घटनाकडे पाहत नाहीत. त्याचंही जबाबदारी काहीतरी असेल तेव्हाच त्यांना लोकशाही शब्दाचा आधार घ्याावा लागतो मात्र जेथे कुपनच शेत खातं तेथे जनमाणसं काय करणार ?

          आरोग्य् यंत्रणा आज ठेकेदाररी बेजबाबदारीत गुंतली आहे. रस्त्यावर अनेक अपघात होतात तिथे अँब्युलन्स् पोहचत नाहीत अनेक अँब्युलन्स् बंद आहेत रुग्णांना खाजगी अँब्युलेन्सचा आधार घ्याावा लागतो इकउे वर्षभर रस्त्यावर अँब्युलेन्स् धुळखात पडुन आहे. तिला उचलून गॅरेजमध्ये नेऊ शकली नाही ज्या आरोग्य् विभागाच्या ताब्यात अँब्युलेन्स् आहे त्यांच्या वरिष्ठ् अधिका-यांनी कधी तपासणी केली आहे काय ?

          अनेक भंगारवाले येवून पहातात गाडी विकायाची आहे काय ? परंतू गाडीवर आरोग्य् यंत्रणेचा सिंबॉल आहे बॅनर आहे. 108 अँब्युलन्स् असा उल्लेख असलेली गाडी रस्त्यावर उभी आहे हजारो लोक रोज पाहतात तिला मात्र सरकारी अधिका-यांना कळत नाही काय ? मायबाप सरकार म्हणावं लागतं होत मात्र आज काय राव म्हणायची वेळ आली आहे. आरोग्याचं तिनतेरा वाजले असताना सरकारनी बेजबाबदार अधिका-यावर शिस्तभंग निलंबनाची कारवाई केली पाहिजे. सरकारी वाहने कुठेही बेवारस दिसतात.

          कल्याण मुरबाड नॅशनल हायवेवर उभी असलेली अँब्युलन्स् सरकारी बाबूची वाट पाहते मला कोण येईल घेण्यासाठी मात्र तिला वालीच नाही कोणी . समोर उभी 108 पाहून सरकारवर संताप व्यक्त् होत आहे मात्र अधिका-यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी यांना काय फरक पडते अँब्युलन्स् मध्ये थोडच त्यांना जावं लागतं.खेड्यापाड्यात आरोग्याची काळजी घेणारं पथक याचं 108 मधून जातहोतं. खेड्यापाड्यात अनेक प्राथमिक आरोग्य् केंद्र् आहेत तिथे नागरिकांना औशधे उपचार मिळत नाही. डॉक्टर उपलब्ध् नाहीत अँब्युलन्स् नाहीत. अनेक प्राथमिक उपचार केंद्र बंद आहेत मात्र आरोग्य् अधिकारी खेटे अहवाल शासनाला देवून मी नाही त्यातली कडी लाव आतली मग नॅशनल हायवेवर 108 कशी धुळखात पडली..!

No comments