web-ads-yml-728x90

Breaking News

सागरी इंजिन देखभाल प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कळविली आहे.

मत्स्यव्यवसाय व सागरी मासेमारीचा विकास आणि विस्तार होण्यासाठी मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सहा महिन्याचे प्रशिक्षण शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात दिले जाते. त्याअनुषंगाने 2020-21 या चालू वर्षातील, 01 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी विहित नमुना अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शासकीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा मुंबई 61 या पत्त्यावर 31 डिसेंबर 2020 पर्यत सादर करावेत, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments