web-ads-yml-728x90

Breaking News

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ विधेयक मंजूर

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र 2020 च्या विधेयकास विधिमंडळात एकमताने मंजुरी देण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या अधिवेशनात सादर करण्यात आले.क्रीडामंत्री सुनिल केदार म्हणाले, राज्यात सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील बालेवाडी येथे आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत.

    या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. या पार्श्वभूमीवर हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारतीचे बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २००.०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२००.०० कोटी याप्रमाणे एकूण रु. ४००.०० कोटी खर्च अपेक्षित आहे.राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे (Sports Science, Sports Management इ.) विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे.

No comments