0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

कोळीवाडा सीमांकनासंदर्भात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.

कोळीवाड्यातील समस्या व त्यावरील उपाययोजना यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. कोस्टल झोन प्राधिकरण, मुंबई महापालिका, पर्यावरण विभाग आदी संबंधीत सर्व विभागांनी यासंदर्भात समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री श्री. ठाकरे यांनी दिले. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर येथील यासंदर्भातील आढावा यावेळी घेण्यात आला.

अंतीम सीमांकन होईपर्यंत ग्रे क्षेत्रातील लोकांना हलवू नये अशी विनंती तेथील नागरिकांनी केली आहे. याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात तशा सूचना मुंबई महापालिकेला देण्यात येतील, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

 

Post a Comment

 
Top