web-ads-yml-728x90

Breaking News

मुंबई उपनगर जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर यांच्याद्वारे जिल्हास्तर क्रीडा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०१९-२० या वर्षाच्या जिल्हा क्रीडा पुरस्काराकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू (पुरुष, महिला व दिव्यांग खेळाडू) आणि क्रीडा मार्गदर्शक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१९-२० या वर्षाकरिता पुरस्कार देण्यात येणार आहेत.

No comments