web-ads-yml-728x90

Breaking News

एमडीएच मसाले उद्योग समूहाचे मालक, ‘महाशय’ धर्मपाल गुलाटी यांचं आज पहाटे निधन

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली

‘असली मसाले सच-सच, एमडीएच…एमडीएच…’ या टॅग लाइनने घराघरात प्रसिद्ध झालेले आणि गेली सहा दशके आपल्या अस्सल मसाल्यांनी देशभरातील घरातील खाद्य पदार्थांना अस्सल देसी चव आणणारे एमडीएच मसाले उद्योग समूहाचे मालक, ‘महाशय’ धर्मपाल गुलाटी यांचं आज पहाटे निधन झालं. टांगेवाला ते मसाला किंग असा त्यांचा प्रवास थक्क करणारा राहिला आहे. धर्मपाल गुलाटी अवघे दीड हजार रुपये घेऊन नशीब अजमावण्यासाठी दिल्लीत आले. सुरुवातीला काहीकाळ टांगा चालवण्याचं काम केलं आणि पुढे याच दीड हजार रुपयांतून त्यांनी एमडीएच मसल्याचं साम्राज्य निर्माण केलं.

धर्मपाल गुलाटी यांनी वयाच्या 98व्या वर्षी विकासपुरी येथील एका रुग्णालयात आज पहाटे 5.38 वाजता अंतिम श्वास घेतला. 1947मध्ये भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर ‘महेशियां दी हट्टी’चे मालक धर्मपाल गुलाटी भारतात आले होते. भारतात आले तेव्हा त्यांच्याकडे अवघे दीड हजार रुपये होते. दिल्लीत आल्यावर त्यांनी आधी 650 रुपयांध्ये एक घोडा आणि टांगा खरेदी केला. त्यानंतर दिल्ली रेल्वे स्थानकात त्यांनी टांगा सुरू करून कुटुंबाचं पोट भरण्यास सुरुवात केली. मात्र, टांगा चालवण्यात त्यांचं मन रमलं नाही. काही दिवसांमध्येच त्यांनी हा टांगा भावाला देऊन करोलबागमध्ये अजमल खान रोडवर मसाले विकण्यास सुरुवात केली.

 

No comments