BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे
पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे घेतला. विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा, जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह यावेळी उपस्थित होते.
Post a comment