0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

उत्तम प्रकारे शेती करून समाजापुढे आदर्श ठेवलेल्या शेतकऱ्यांना कृषी विस्तार कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी ५००० शेतकऱ्यांची रिसोर्स बॅंक तयार करण्यात आली आहे. त्यातील सर्व शेतकऱ्यांशी कृषिमंत्री दादाजी भुसे उद्या दि. ७ डिसेंबर रोजी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.दुपारी ३.०० वाजता होणाऱ्या या संवाद कार्यक्रमात कृषि विभागाच्या Agriculture Department, GoM या युट्युब चॅनेलद्वारे शेतकरी बांधव कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या एकूण ३६०६ शेतकरी बंधू भगिनींची रिसोर्स बँकेच्या यादीचे अनावरण कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते दिनांक जुलै २०२० मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथे झाले. याबरोबरच विविध कृषि पुरस्कार विजेते व पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार सद्यस्थितीत एकूण ५००९ शेतकऱ्यांची रिसोर्स बँक तयार झाली आहे.

Post a Comment

 
Top