0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - पडघा: भिंवडी

भिंवडी तालुक्यातील पडघा वनपरीमंडळातील दुर्गम भागात असलेल्या एका गावात अवैधरीत्या दडवुन ठेवलेल्या खैर साठ्यावर वनविभागाने धाड टाकून सोलीव ५९ खैराची ओंडकी जप्त केल्याने खैर तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. पडघा पाच्छापुर रस्त्यालगत असलेल्या राहुर - सावरोली गावादरम्यान एका शेतात मोठ्या प्रमाणात खैराची ओंडकी दडवून ठेवल्याची खबर वनविभागाला मिळताच पडघा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे, वनपाल डी. बी माळी, ए. एस. काटेस्कर, वनरक्षक बी. एन. आंबुलगेकर, एस. एन. चिपळूणकर, एस. शेलार, प्रमोद सुतार, विष्णु अस्वले, अजय राठोड, संदीप पाटील, शरद माढा, वनमजूर भगवान सवर, कार्यालयीन कर्मचारी महेंद्र भेरे चालक विकास उमतोल या वनविभागाच्या पथकाने या ठिकाणी सोमवारी धाड टाकून सोलीव खैराची २.५० लाख रुपयांची ५९ ओंडकी जप्त करून ताब्यात घेतली आहेत.

Post a Comment

 
Top