पुरवठा विभागात पारदर्शकतेसाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करा-राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
अन्न व नागरी पुरवठा विभागात पारदर्शकता यावी यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच चांगल्या दर्जाचे तांदूळ पुरवठा विभागाला मिळावे, यासाठी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या धान खरेदी केंद्राबरोबरच धानाचे मिलिंग होणाऱ्या मिलमध्येही सीसीटीव्ही बसवावेत, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बळकटीकरण व पारदर्शकता आणण्यासंदर्भात राज्यमंत्री डॉ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव विलास पाटील, सहसचिव मनोकुमार सुर्यवंशी यांच्यासह माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
No comments