0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.क्रीडामंत्री श्री.केदार म्हणाले, विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व  स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे ३ अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात ५० विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील.यामुळे शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल असेही श्री. केदार यांनी सांगितले. 

Post a Comment

 
Top