web-ads-yml-728x90

Breaking News

जीवधन किल्ल्यावर रंगला व्हॅलीक्रॉसींगचा थरार;ग्रामीण भागातील मुरबाडच्या सह्यगीरी अॅडवेंचरची कामगिरी..

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

जुन्नर मधील सातवाहन काळातील मुख्य व्यापारी रस्ता नानेघाट. या नानेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी जीवधन किल्ल्याचा वापर होत होता. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवून संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणून घोषित केले व स्वतः वजीर बनले. याच जीवधन किल्ल्याच्या बाजुला ३५० फुट उंच वानरलिंगी सुळका आहे. वानरलिंगी सुळका ते जीवधन किल्ला येथे दोर बांधून व्हॅलीक्रॉसींग मोहिमचे नियोजन दि. १९ व २० डिसेंबर रोजी सह्यगीरी अ‍ॅडवेंचर च्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी वानरलिंगी सुळक्यावर चढाई करणे गरजेची असते. नाशिक येथील अमोल तेलंग व सहकाऱ्यांनी सुरक्षित आरोहन तंत्राचा वापर करून यशस्वी चढाई करून वानरलिंगी ला दोर बांधला. वानरलिंगी सुळका ते जीवधन किल्ला या दरम्यान असलेल्या दरी मधुन दोर ताणुन तो योग्य प्रकारे बांधुन २७० फुट झिपलाईन तयार केली. सह्यगीरी च्या दिपक विशे व कुसुम विशे यांनी तंत्रशुद्ध सुरक्षित असा सेटअप लावला होता. जीवधन किल्ल्यावरून वानरलिंगी सुळक्यावर दोरीच्या साह्याने दरी मधिल थरारक अंतर पार करण्यासाठी विशेष पुणे, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, नाशिक या सहा जिल्ह्यांमधून साहसी खेळाडू सहभागी झाले होते. या मध्ये सर्वात लहान अशा ०७ वर्षीय वन्हीशिखा पाटील हीने न घाबरता यशस्वीरीत्या व्हॅलीक्रॉसींग केली तर नंदकुमार कारभारी यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी ३५० फुट असा वानरलिंगी सुळका आरोहन केला. या साहसी क्रीडा प्रकारात एकुण ६६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यात विशेष १५ महिलांचा सहभाग होता. सुळक्यावर पोहचलेल्या सदस्याला ३५० खाली उतरवण्याची जबाबदारी वाड्याच्या गिरीश डेंगाणे व आकाश पालकर, पराग दादा यांनी सांभाळली.

1 comment: