web-ads-yml-728x90

Breaking News

कर्जत-जामखेड पोलिसांना मिळालेली नवी वाहने गुन्हेगारी रोखण्यास उपयुक्त ठरतील – गृहमंत्री अनिल देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

कर्जत-जामखेड पोलीस दलासाठी एकात्मिक विकास संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळालेली वाहने या दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन गुन्हेगारी रोखण्यास तसेच सर्वसामान्यांना, माता भगिनींना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत-जामखेड येथील पोलीस बांधवांना देण्यात येणाऱ्या वाहनांचा लोकार्पण सोहळा आज मंत्रालय येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, एडीजी श्री. जगन्नाथन, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक‍ मनोज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments