0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी श्री.देसाई बोलत होते. यावेळी उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, प्रधान सचिव (उद्योग) श्री.वेणूगोपाल रेड्डी , महाराष्ट्र उद्योगविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, ‘कॉर्नेल महा 60’ चे संचालक प्रोफेसर ॲलन, कॉर्नेलचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. डेव्हिन बिगॉनेस आणि एक्सईडी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिंगापूरचे मिस्टर जॉन कॅलेलिल हे उपस्थित होते.

Post a Comment

 
Top