web-ads-yml-728x90

Breaking News

सुरक्षा व बचाव क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात सुरक्षा, बचाव व अग्निसुरक्षा उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. देशातील कोरोनाचे संकट लवकरच संपत आहे, मात्र राष्ट्रीय सुरक्षा व बचाव हा विषय संपणारा नाही. आगामी काळात सुरक्षा व बचाव उद्योग क्षेत्र नव्याने भरारी घेईल व या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केला.

इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट या अशासकीय शैक्षणिक संस्थेच्या ३० व्या वार्षिक जागतिक परिषदेचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत राजभवन येथून झाले त्यावेळी ते बोलत होते.सुरक्षा व बचाव क्षेत्रात कार्य करणाऱ्या शासकीय तसेच खाजगी मनुष्यबळाला कार्यक्षमता वृद्धीसाठी नियमितपणे शास्त्रीय प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सेफ्टी अँड सेक्युरिटी मॅनेजमेंट ही जागतिक ख्यातीची संस्था शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्यवर्धनाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करीत असतानाच राष्ट्रीय सुरक्षेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

No comments