web-ads-yml-728x90

Breaking News

नागपूर येथील मेडिट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्प‍िटलसंदर्भातील तक्रारींची तातडीने चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

नागपूर येथील मेडीट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्प‍िटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीसंदर्भात या हॉस्पीटलची तातडीने चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

नागपूर येथील मेडीट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्प‍िटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणी तक्रारीसंदर्भात विधानभवन येथे बैठक झाली.

यावेळी उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत,आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास तसेच संबधित विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

No comments