0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भोकर तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढ, पिंपळढव साठवण तलाव व जलसंधारण विभागाच्या सिंचन योजनांना पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी तत्वत: मान्य करुन यासंदर्भातील कार्यवाही जलद गतीने करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. यामुळे या प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांसंदर्भातील आणि भोकर तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा, जलसंपदा विभागाचे सचिव एन .व्ही. शिंदे, श्री घाणेकर, ‘मेरी’ नाशिकचे मुख्य संचालक श्री. कोहीरकर उपस्थित होते.

 

Post a Comment

 
Top