web-ads-yml-728x90

Breaking News

सुप्रिया सुळेंना राज्यात रस नाही- शरद पवार

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्राच्या राजकारणात रस आहे, असं सांगत सुप्रिया यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. पण पवारांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात रस नाही. त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रियांना देशपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करायला आवडतं. प्रत्येकाचा एक इंट्रेस्ट असतो. सुप्रियांचा इंट्रेस्ट तिकडे आहे, असं पवारांनी सांगितलं.

No comments