web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड मधील महा इ सेवा केंद्रामुळे नागरिकांची चिंता दुर

 


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

कोरोना काळात सर्व व्यवहार काम धंदे हे ठप्प झाले होते याच पाश्‍वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री यांनी संवेदनशिल दाखवून या कोरोना महामारीवर मात करून महाराष्ट्र वाचवण्याचा काम केलं आहे व करत आहेत.यामुळे नागरिकांची राहिलेले काम आता पुर्व पदावर येवू लागले आहेत.तसेच मुरबाड तालुक्यातील महा इ सेवा केंन्द्राचे काम आता पुर्वपदावर आले असून मुरबाड मधील भावार्थे व निलेश पाटील यांनी महा इ सेवा केंद्राच्या माध्यमातुन मुरबाड मधील नागरिकांच्या कामाला गती दिली आहे.कित्येक महिने लोकांचे आधार कार्डावरील नाव,गाव चेंज काम काज कोरोना मुळे राहून गेले होते.हे काम मात्र आता कोरोनाशी एक हात करून आपल्या कार्यालयात सॅनिटाइजर मास्कची शिस्त पाळून सामान्या गोरगरीब जनतेचे कामे मार्गी लावण्याचं काम भावार्थे व त्यांचे सहकारी निलेश पाटील यांनी महा इ सेवा केंन्द्राच्या माध्यमातुन केले आहे. तमाम जनतेने आपली कामे सुरळीत पणे होत असल्याने महा इ सेवा केंन्द्राचे आभार मानले.हे महा इ सेवा केंन्द्र मुरबाड नगरपंचायत कार्यालयाच्यावर सुरू आहे.

No comments