web-ads-yml-728x90

Breaking News

श्री समर्थ सुपर बाझार ची शाखा आता टिटवाळयातही ; आमदार किसनजी कथोरे यांच्या शुभहस्ते झाले या शाखेचे उद्घाटण

 

BY - कुणाल शेलार, युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

नवनवीन स्कीम,बरपुर फायदे,वेळेची बचत आणि सुपर क्वालिटीसाठी प्रसिध्द म्हणून ग्रामीण भागातून शहरीभागात असणारे श्री समर्थ सुपर बाझार एकमेव प्रगतशील ठरली आहे. श्री समर्थ सुपर बाझार च्या मुरबाड तालुक्यात दोन शाखा असून तिसरी शाखा आता थेट टिटवाळयात सेवा देण्यासाठी सज्ज झाली आहे.सावरकर नगर जवळी मांडा-टिटवाळा येथे काल या श्री समर्थ सुपर बाझार च्या शाखा सुरू झाली असून या शाखचे श्री.काशिनाथ गोविंद झुंझारराव,हेमंत विश्‍वनाथ चौधरी,मनोहर विठ्ठलराव हिंदुराव,नविन जयवंतराव झुंझारराव यांच्या अधिपत्याखाली ही शाखा खोलण्यात आली आहे.मुरबाडच्या श्री समर्थ सुपर बाझार नी उत्तुंग गगन भरारी घेतली असून मराठी उद्दयोगपती म्हणून प्रदोष हिंदुराव यांच्या पुढाकाराने मुरबाडच्या तरूणांना रोजगाराची संधी म्हणून दिली असताना आता टिटवाळयातही मराठी तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार यात शंका नाही.टिटवाळयात श्री समर्थ सुपर बाझार च्या शाखेचे उद्घाटण कोकणाचे आधारस्तंभ,ठाणे जिल्हयाचे पालकत्व तसेच मुरबाड विधानसभेचे आमदार किसनजी कथोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी या बहरदारी उद्घाटणास शिवाजीराव देशमुख (उद्दयोजक-डोळखांब),दिपक ठक्कर(उद्दयोजक),आकाश सावंत(उद्दयोजक-शहापूर),शिवकुमार मिश्रा(उद्दयोजक-कल्याण),मिलींद देशमुख(उद्दयोजक-डोंबिवली),प्रमोद शर्मा(उद्दयोजक),भाविन बलसारा(उद्दयोजक) व अन्य मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.          टिटवाळा करांना सेवा देण्यासाठी श्री समर्थ सुपर बाझार सज्ज झाली असून या मॉलमध्ये अत्यंत कमी किमतीत आणि वाजवी दरात आता वस्तु गोरगरिबांना मिळणार असून घरपोच सेवा ही त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. श्री समर्थ सुपर बाझार चे धडाडी पाऊल पडतांना सर्व नागरिकांनी श्री समर्थ सुपर बाझार चे संस्थापक,संचालक मंडळाचे आभार मानले असून त्यांचे कार्याची प्रशंसा केली आहे.त्याचबरोबर श्री समर्थ सुपर बाझार ही भविष्यात तळागळात जाऊन सर्वसामान्य जनतेची सावली बनेल यात शंका नाही अशी चर्चा ग्रामीण भागात उमटू लागली आहे.त्यामुळे श्री समर्थ सुपर बाझार ला पुढिल वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छाही देण्यात आले आहे.आमदार किसनराव कथोरे यांनी ही श्री समर्थ सुपर बाझार ची प्रशंसा करित त्यांचे कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.रोजगाराची संधी आता गावातील तरूण वर्गाला उपलब्ध झाल्या असून श्री समर्थ सुपर बाझार नी केलेल्या या कार्याची वाटचाल ही ध्येयात्मक आणि विश्‍वासू असल्याचेही यावेळी आमदार किसनराव कथोरे यांचेसह अन्य मान्यवरांनी आपल्या संभाषणात व्यक्त केल्या आहेत.

 

No comments