web-ads-yml-728x90

Breaking News

AMUच्या शताब्दी सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव –  अलीगड

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अलीगड मुस्लिम विद्यापीठ अर्थात AMUच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अलीगड मुस्लिम विद्यालयाला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी 1964 मध्ये तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री AMUच्या दिक्षांत सोहळ्यात सहभागी झाले होते. तेव्हा शास्त्रीजींना AMUकडून LLDची मानद पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं.

कोरोना विषाणूच्या प्रसाराचा धोका लक्षात घेता शताब्दी सोहळ्याचे सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासह या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

No comments