web-ads-yml-728x90

Breaking News

पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी 6695 कोटींचा प्रकल्प

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments