कॉमेडी किंग अरूण कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रॉफिक पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप ; यंदाचा वाढदिवस साजरा होणार नाही
BY
- कुणाल शेलार ( 9623609100 ), युवा महाराष्ट्र
लाइव – मुंबर्इ |
असंख्य अभिनेत्यांच्या सोबत काम केलेले व संपूर्ण महाराष्ट्राचे कॉमेडी किंग ठरलेले मुंबर्इ शहारातुन जन्मघेतलेले अरूण कदम यांचा आज वाढदिवस.हास्य क्षेत्रात येण्या अगोदर अत्यंत गरिब परिस्थितीतून शिक्षण घेत यशावर विराजमान झालेले अरूण कदम भविष्याच्या पानावर कॉमेडी किंग म्हणून चमकले.हिरा जसा आपले चमकणे सोडत नाही तसेच कॉमेडी क्षेत्रात गेल्याने हास्याची जत्रा कमी होत नाही.याच कॉमेडीच्या दुनियेत असणारा अरूण कदम नामक हिरा महाराष्ट्राला लाभला आणि आपल्या कॉमेडीतून संपूर्ण महाराष्ट्र हास्याच्या जत्रेत समाविष्ट झाली.अनेक दिग्गज्यांच्या सोबत काम करणारे कॉमेडी किंग अरूण कदम लाखो जनतेच्या मनात ठसून गेले आहेत.ज्यांनी संपूर्ण आयुष्य जनसामान्यांना हसविण्यात घालवले,ज्यांच्या कॉमेडी साक्षात्कारतेची लाखो करोडे जनता आतुरतेने टि.व्ही वर दबा धरून कॉमेडीची हास्य जत्रा पाहण्यासाठी लक्ष लावून बसतात,व ज्यांना कॉमेडी किंग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र,भारत देश ओळखते असे कॉमेडी किंग अरूण कदम यांचा आज 2 नोव्हेंबर रोजी वाढदिवस.
अरूण कदम यांची कॉमेडी हास्यजत्रा आज ग्रामीण
भागाच्या गावागावातून शहारात तसेच जिल्हयातून राज्यभरात,देशभरात फेम म्हणून पाहिली
जाते.लाखो जनतेच्या हृदयावर त्यांनी कॉमेडीच्या माध्यमातुन आपल्या प्रतिमेची छबी उमटवली
आहे.अरूण कदम हे मुळचे मुंबर्इ येथिल दहिसर ताडदेव येथिल राहणारे आहेत.त्यांनी आपली
सुरूवात प्रथम महाराष्ट्राची लोकधारा नावाच्या शोमधून केली.सन 1990 सालापासून त्यांनी
आपल्या कॉमेडीची सुरूवात केली.आज त्यांच्या गरूडझेप वाटचालीला 25 वर्ष पुर्ण झालेली
आहे.हास्याच्या दुनियेतील राजमाणूस म्हणून पुढे पुढे ते जनतेचे कॉमेडी किंग झाले.शुन्यातून
सुरू झालेला प्रवास आज यशशिखरावर जाऊन पोहोचला आहे.हे यश केवळ त्यांचे नसून त्यांना
पसंद केलेली आणि आपल्या मनात स्थान देऊन कौटूंबिक सदस्य बनविणार्या लाखो जनतेचे असल्याचे
कॉमेडी किंग अरूण कदम यांनी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वॄावाहिनी तसेच शासन मान्यताप्राप्त
स्वप्नज्योती टार्इम्स वृत्तपत्राशी बोलतांना सांगितले आहे.
लाखो जनता माझे वाढदिवस
साजरे करण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी भेट देण्यासाठी यायची परंतू कोरोना पार्श्वभूमी
पाहता आपण मला मॅसेज,फोनद्वारे शुभेच्छा दयावे व माझी आपली भेट होणार नाही तसेच मी
वाढदिवस यंदाच्या वर्षी साजरा करणार नाही असे या माध्यमातून सर्व चाहत्यांना आवाहन
करण्यात आले आहे.सर्वांनी आपल्या कुटूंबाची व स्वतःची काळजी घ्यावी या दृष्टिकोणातून
आपल्या मनातून मला देण्यात येणार्या शुभेच्छा हि खरी संपत्ती माणून आपले आभार मानतो
असे कॉमेडी किंग अरूण कदम यांनी आमच्या माध्यमातून तमाम जनतेशी आजच्या वाढदिवसाच्या
शुभमुहुर्तावर संवाद साधला आहे.
No comments