web-ads-yml-728x90

Breaking News

ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, तर शहरात शाळा राहाणार बंद

 

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |

राज्यातील शाळा सोमवारपासून (२३ नोव्हेंबर) सुरू होणार असल्या तरी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत, असे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. त्यानंतर औरंगाबादमध्ये फक्त ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या शहरांनी काल (२० नोव्हेंबर) बैठक घेत ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर औरंगाबाद महानगरपालिका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असताना, कोरोनाचे वाढते संकट पाहता पालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी देखील शहरातील शाळा ३ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षकांना शाळेत यावे लागणार, अशी माहिती त्यांनी दिली.

No comments