0

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यातून दूषित पाणी धरण क्षेत्रात सोडण्यात येत आहे. धरणाचे पाणी दूषित होऊन शहराला दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग यांनी धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.अंबरनाथ शहरातील वाढत्या दूषित पाणी प्रश्नासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात घेण्यात आली. यावेळी आमदार बालाजी किणीकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणेचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एस के दशोरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव राजेंद्र गैगने, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

Post a Comment

 
Top