web-ads-yml-728x90

Breaking News

मिठी नदी पात्रातील बाधित झोपडपट्टीधारकांचे त्वरित स्थलांतर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

मिठी नदी पात्रातील क्रांती नगर, संदेश नगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील झोपडपट्ट्यांचे स्थलांतर करण्याबाबत बैठकीचे आयोजन वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. या बैठकीस नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार अशोक लांडे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे आदी उपस्थित होते.

No comments