web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यभरात १७ नोव्हेंबरपासून मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघांच्या मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. 17 नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. मतदार यादीतील नाव, पत्ता आदी दुरुस्त्या करण्याची संधी यामुळे मिळणार आहे.1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार याद्या मंगळवार दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. प्रारुप मतदार याद्यांमध्ये ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केलेली नसतील असे मतदार नाव नोंदणीसाठी विहित नमुन्यात अर्ज करु शकतील. तसेच या याद्यांतील नावांबाबत आक्षेप असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती, सुधारणा करावयाच्या असल्यासही दावे व हरकती दि. 15 डिसेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) यांच्या कार्यालयात स्वीकारल्या जाणार आहेत.

No comments