0

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या तयारीच्या नियोजनाचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.सामाजिक न्याय मंत्री श्री. मुंडे यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्मारकाच्या बांधकामासंदर्भात एम एम आर डी ए, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, स्मारकाचे काम करणारी कंपनी यांच्यासमवेत बैठक घेऊन आढावा घेत ही सर्व कामे दोन महिने अगोदर म्हणजेच मार्च 2023 पूर्वी झाले पाहिजे अशा सूचनाही दिल्या.

Post a comment

 
Top